हा तुमच्यासाठी कृती करण्याचा काळ आहे. विविध क्षेत्रातून अनपेक्षित भेटवस्तू आणि लाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि सर्वांगीण समृद्धी लाभेल. तुमचे शत्रू तुमच्या मार्गात अडथळ्या होण्याचा विचारही करणार नाहीत आणि तुमच्याकडे इतर लोक आकर्षित होतील व तुमची प्रतिमाही उंचावेल. शासनकर्ते, वरिष्ठ आणि अधिकारी यांची तुमच्यावर मर्जी राहील. तुमचे आरोग्य निरोगी राहील. यंदा वाहनप्राप्तीचा योग आहे.
Apr 17, 2024 - Jun 17, 2024
या काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.
Jun 17, 2024 - Jul 05, 2024
आक्रमक होऊ नका कारण आक्रमकपणामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. मित्रांसोबत वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, तसे नाही झाले तर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आर्थिक चढ-उतार संभवतात. परिवारातील एकोपा आणि सामंजजस्यात अभाव होण्याची शक्यता. आई व पत्नी यांच्यात वाद संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी, डोळ्याचे विकार, पोटाचे विकार, पायात सूज येणे या आजारांबाबर ताबडतोब उपचार करा.
Jul 05, 2024 - Aug 04, 2024
हा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.
Aug 04, 2024 - Aug 26, 2024
परीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
Aug 26, 2024 - Oct 19, 2024
या काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.
Oct 19, 2024 - Dec 07, 2024
काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.
Dec 07, 2024 - Feb 03, 2025
या कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे पूर्णपणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. जमीन किंवा यंत्राची खरेदी काही काळ पुढे ढकला.
Feb 03, 2025 - Mar 27, 2025
उत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.
Mar 27, 2025 - Apr 17, 2025
व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.