हा तुमच्यासाठी अनुकूल काळ आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होऊन तुम्हाला मिळालेल्या यशाची चव चाखू शकता. तुम्ही लोकप्रिय व्यक्तींच्या संपर्कात याला. परदेशातून मिळणाऱ्या लाभामुळे तुमची पत वाढण्यास मदत होईल. वरिष्ठ आणि अधिकारी यांच्याकडून लाभ होईल. पत्नी आणि मुलांकडून सुख मिळेल. घरी धार्मिक कार्य घडेल, याचमुळे तुम्हाला लोकप्रियता मिळेल आणि नशीबही तुमच्या बाजूने असेल.
Mar 14, 2024 - Apr 14, 2024
तुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईळ. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.
Apr 14, 2024 - May 05, 2024
मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. जखमा आणि घाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सांभाळून चालवा.
May 05, 2024 - Jun 29, 2024
फायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.
Jun 29, 2024 - Aug 17, 2024
तुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.
Aug 17, 2024 - Oct 13, 2024
नोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या जायद हामिद ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.
Oct 13, 2024 - Dec 04, 2024
आरोग्याच्या तक्रारी वाढतील. आरामदायी वस्तुंवर आणि शानशौकीच्या वस्तुंवर खर्च करण्याच्या तुमच्या सवयीमुळे पैसा राखणे कठीण असेल. सट्टेबाजारातील व्यवहारांसाठी हा चांगला काळ नाही. लहानसहान गोष्टींवरून भांडणे, गैरसमज, वाद यामुळे कौटुंबिक शांतता आणि प्रसन्नता ढासळेल. तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती समस्या तयार करतील, तुमच्यावर कोणताही आधार नसतानाही आरोप होतील आणि तुमच्या कुटुंबाला दु:खी करतील, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्हाला महिलांकडून त्रास होईल, त्यामुळे सावधानता बाळगा.
Dec 04, 2024 - Dec 25, 2024
हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील.
Dec 25, 2024 - Feb 24, 2025
तुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.
Feb 24, 2025 - Mar 14, 2025
तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. तुमच्या शत्रुंचा पराजय होईल. नोकरीमध्ये बढतीची शक्यता. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळेल. कायदेशीर बाबीत जिंकाल. एकुणातच हा यशदायी कालावधी आहे. आगीपासून सावध राहा आणि डोळ्यांना जपा. आईच्या किंवा आईच्या नात्यातील व्यक्तींमध्ये आजारपण संभवते.