जवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.
Jun 15, 2026 - Aug 08, 2026
या काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.
Aug 08, 2026 - Sep 26, 2026
तुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.
Sep 26, 2026 - Nov 23, 2026
नवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.
Nov 23, 2026 - Jan 13, 2027
मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.
Jan 13, 2027 - Feb 04, 2027
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.
Feb 04, 2027 - Apr 06, 2027
तुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.
Apr 06, 2027 - Apr 24, 2027
हा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.
Apr 24, 2027 - May 24, 2027
हा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुमच्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.
May 24, 2027 - Jun 15, 2027
आर्थिक लाभ होण्यासाठी हा कालावधी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संभवतो. कौटुंबिक वादामुळे तुमची मन:शांती ढळण्याची शक्यता आहे. तुम्ही वापरलेल्या कठोर शब्दांमुळे तुम्ही गोत्यात याल. उद्योगाशी संबंधित एखादी वाईट बातमी मिळू शकते. मोठे नुकसान संभवते. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करण्याची शक्यता आहे.