तुमच्या बुद्धिमत्तेची सर्व स्तरांतून प्रशंसा होईल. तुमचा व्यवसाय आणि उद्योग यात तुम्ही चमकाल. कुटुंबात होणारा बाळाचा जन्म तुम्हाला आनंद देईल. या काळात ज्ञान आणि धार्मिक शिकवण मिळेल. या काळात तीर्क्षक्षेत्री किंवा एखाद्या मनोरंजन स्थळाला भेट द्या. तुमचा सन्मान होईल आणि शासनकर्ते व उच्च अधिकारी यांच्याकडून तुमची प्रशंसा होईल.
Jun 12, 2026 - Jun 30, 2026
स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.
Jun 30, 2026 - Jul 31, 2026
कुटुंबात एकोपा आणि समजुतदारपणा वाढेल. तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी, तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे. मित्र आणि अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लाभकारक ठरतील. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. या काळात तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल. तुमच्या मुलांनाही यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. एक सुखासीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे.
Jul 31, 2026 - Aug 21, 2026
तुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.
Aug 21, 2026 - Oct 15, 2026
तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.
Oct 15, 2026 - Dec 02, 2026
काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.
Dec 02, 2026 - Jan 29, 2027
या कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.
Jan 29, 2027 - Mar 22, 2027
उत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.
Mar 22, 2027 - Apr 12, 2027
भागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.
Apr 12, 2027 - Jun 12, 2027
या काळात तुम्ही चैनीच्या वस्तु आणि ऐषआरामात दिवस घालवाल, पण ते व्यवस्थित आहे अथवा नाही यांची काळजी घ्या. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आय़ुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. आर्थिक दृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या स्वत:च्या प्रकृतीला जपा.