chat_bubble_outline Chat with Astrologer

सेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा

Ajey Nagar 2026 जन्मपत्रिका

Ajey nagar Horoscope and Astrology
नाव:

Ajey nagar

जन्मदिवस:

Jun 12, 1999

जन्मवेळ:

14:14:39

जन्मस्थान:

Faridabad

रेखांश:

77 E 19

ज्योतिष अक्षांश:

28 N 25

काल विभाग:

5.5

माहिती स्रोत:

Kundli Sangraha (Bhat)

अॅस्ट्रोसेज मूल्यांकन:

अचूक (अ)


प्रेम राशी कुंडली

तुम्ही अगदी सहज लग्न कराल. बरेचदा प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त महत्त्व दिले जाते. तुम्ही फार प्रेमपत्र वगैरे लिहिणार नाही. तुमच्या संबंधांमध्ये जितका कमी रोमान्स येईल, तितके चांगले राहील. पण लग्नानंतर मात्र असे करणे उचित राहणार नाही. लग्नानंतर मात्र तुम्ही रोमान्स अगदी मनपासून कराल आणि काही वर्ष उलटून गेल्यावरही तुम्ही तसेच राहाल.

Ajey Nagarची आरोग्य कुंडली

तुम्ही आरामासाठी खूप पैसे खर्च करता. त्यामुळे तुम्ही खवय्ये आहात आणि तुम्ही जेवणाचा आस्वाद घेता. किंबहुना तुम्ही जगण्यासाठी खात नाही तर खाण्यासाठी जगता. त्यामुळे तुमच्या शरीराचे आकारमान कसे असेल ते वेगळे सांगायला नको, त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेची काळजी घ्यायला हवी. अपचन किंवा तत्सम आजारांकडे दुर्लक्ष करू नका, आणि ते बरे करण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहू नका. हलका व्यायाम करण्यावर आणि शारीरिक हालचालीवर भर द्या. शुद्ध हवेत श्वासोच्छवास करा, हलका आहार घ्या आणि फळे खा. इतके करूनही आजार बरा झाला नाही तर ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या. वयाच्या पन्नाशीनंतर येणाऱ्या जडत्वाकडे किंवा सुस्तीकडे लक्ष द्या. तुम्हाला कदाचित काही गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि तुमचे तुमच्या आयुष्यावर नियंत्रण असणार नाही. विविध गोष्टींबाबतची तुमची आवड कायम ठेवा, निरनिराळे छंद जोपासा आणि एखादी व्यक्ती तरुणांमध्ये मिसळत असली तर ती कधीच वृद्ध होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.

Ajey Nagarच्या छंदाची कुंडली

तुम्हाला परिश्रम करायला लावणारे छंद आहेत. क्रिकेट, फूटबॉल, टेनिस यासारखे खेळ तुम्हाला आवडतात. तुम्ही दिवसभर तुमच्या व्यवसायात काम कराल आणि संध्याकाळी गोल्फ, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळाल. तुम्हाला अॅथलेटिक खेळांमध्ये सहभागी होण्याची भरपूर इच्छा आहे. तुम्ही खेळांमध्ये अनेक बक्षीसे मिळविली असतील. खेळांबाबत तुमच्यातील चैतन्य आणि उर्जा वाखाणण्याजोगी आहे.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer